आ.नितेश राणे यांच्या मध्यस्थीने स्टॉलधारकांचा प्रश्न निकाली

वैभववाडी शहर लवकरच घेणार मोकळा श्वास

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील शासकीय जागेतील स्टॉल हटविण्याबाबत नगरपंचायतने स्टॉल धारकांना नोटीस बजावली होती. त्या पार्श्वभुमीवर वैभववाडीत नगरपंचायत समोर स्टॉल धारकांनी काही दिवसांपूर्वी उपोषण सुरू केले होते. अखेर या प्रकरणी स्टॉल धारक व नगरपंचायत प्रशासन यांच्यात आमदार नितेश राणे यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला आहे. शहरातील स्टॉल गुरुवारी स्वतः स्टॉल धारक काढणार आहेत त्यांना तात्पुरती पर्यायी जागा देवून त्यानंतर नगरपंचायत च्या माध्यमातून कायमस्वरूपी त्यांचे पुनर्वसन केले जाईल अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी काल स्टॉल धारकांबरोबर झालेल्या बैठकीत दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत वैभववाडी शहर मोकळा श्वास घेणार आहे.

error: Content is protected !!