भूषण, आमच्या आशीर्वादाशिवाय नगरसेवक होवून दाखवा- प्रमोदशेठ मसुरकर
कणकवली (प्रतिनिधी): उ.बा.ठा.शिवसेना आमदार वैभव नाईक यांच बोट धरून भूषण परुळेकर यांनी राजकारण केले. आणि त्याच आ. वैभव नाईक यांचे भवितव्य अधांतरी वगैरे ठरवण्या एवढे आपण मोठे नाहीत, अथवा ज्योतिषी नाहीत.भूषण परुळेकर यांनी आम. वैभव नाईक यांची काळजी करू नये, आपल्या पदाची, पक्षाची काळजी करावी. ३१ डिसेंबर ला तुमच्या गटाचे काय ते चित्र स्पष्ट होईल. तुम्ही सर्व प्रथम कणकवली नगरपंचायत निवडणुकीत आमच्या आशिर्वाद शिवाय साधे नगरसेवक होऊन दाखवा, नंतर मा.आमदार वैभव नाईक यांच्या भवितव्याची चिंता करा असा टोला शिवसेना उ.बा.ठा. शिवसेना गटाचे शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे कणकवली तालुका प्रमुख भूषण परुळेकर यांना लगावला. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा कशी व्हेंटिलेटरवर आहे हे परुळेकर यांनी उदाहरणादाखल कणकवली उपजिल्हा रुग्णालयात जाऊन बघावे. सिंधुदुर्गात 70 टक्के वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असतानाही अधिवेशनात आरोग्य यंत्रणा सुरळीत आहे म्हणणाऱ्या महायुती चे आरोग्यमंत्र्यांचा कसा निषेध सिंधुदुर्गवासीयांनी केलाय हे जरा उघड्या डोळ्यानी बघा.सर्वसामान्य जिल्हा वासीयांशी सोयरसुतक नसणाऱ्या आणि जनाधार नसणाऱ्या आपली सारख्या दरबारी राजकारण्यांना जनतेचे हाल दिसणार नाहीत अशी टीकाही मसुरकर यांनी केली.












