कणकवली (प्रतिनिधी) : व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने साद फाऊंडेशनमार्फत ‘माझं व्हॅलेंटाईन’ ही सर्व वयोगटासाठी खुली पत्रलेखन व काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आपली आवडती व्यक्ती, वस्तू, पुस्तक, ठिकाण अशा कोणत्याही विषयावर पत्र किंवा कविता लेखन करायचे होते. आज संध्याकाळी ५.३० वाजता या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कणकवली पोस्ट ऑफिसच्या वर युनिक हॉल येथे होणार असून यावेळी कवयित्री व गायिका रुपाली कदम, समीक्षक व लेखक अच्युत देसाई आणि साद फाउंडेशन सिंधुदुर्ग च्या अध्यक्षा आणि कुडाळ नगरपंचायत च्या प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक यांनी प्रमुख उपस्थिती असणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण केले जाणार असून यावेळी विजेत्यांचे लेखन त्यांच्याच शब्दांत ऐकण्याची संधी मिळणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सचिन कोर्लेकर, गौरेश नाईक, वर्षा तळेकर, अपूर्वा गोलतकर यांनी केले आहे.
साद फाउंडेशन आयोजित ‘माझं व्हॅलेंटाईन’ लेखन स्पर्धेचे आज बक्षिस वितरण











