मोबाईल, टी.व्ही पासून परावृत्त करण्यासाठी मुलांना बालपणापासून खेळाकडे वळविणे गरजेचे – संजना आग्रे

बौद्धिक शिक्षणाबरोबर शारीरिक तंदुरुस्ती अत्यावश्यक – सावंत एम.टी

लिटील फ्लॉवर स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी): बौद्धिक शिक्षणाबरोबर शारीरिक तंदुरुस्ती सुद्धा मुलांच्या भवितव्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पारंपारिक खेळ, व्यायाम, कसरती यामध्ये भाग घेऊन प्राविण्य मिळवणे गरजेचे आहे. त्याची सुरुवात लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बालवयापासून होत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे.असे उद्गार ज्येष्ठ नागरिक एम.पी. तथा आप्पा सावंत यांनी काढले. वार्षिक स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले .तर पदाधिकारी शिक्षक वर्ग यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी फोंडाघाटच्या सरपंच सौ. संजना आग्रे, संस्थेचे पदाधिकारी संचालक सुभाष सावंत, शेखर लिंग्रस, रंजन नेरूरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन स्वरा तळेकर यांनी केले. अगदी बालवाडी पासून घरातील मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण मोबाईल,लॅपटॉप, टीव्ही अन् सोशल मीडियाच्या चकव्या त अडकत चालले आहेत. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती कडे ना पाल्याचे लक्ष ना पालकांचे ! ही बाब येणाऱ्या पिढीच्या संतुलित भविष्याला धोका निर्माण करणारी आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी आपल्या मुलांना शारीरिक खेळामध्ये प्रवृत्त करणे ही पालकांची जबाबदारी आहे.

या निमित्ताने लिटिल फ्लावरच्या शिक्षक वर्गाचे, क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबद्दल कौतुक करावं तेवढं थोडं— या स्पर्धेतून उद्याचे खेळाडू निर्माण व्हावेत ,अशा शुभेच्छा सरपंच सौ .संजना आग्रे यांनी यावेळी दिल्या.त्यांनी स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य ही केले. छोट्या छोट्या मुला- मुलींनी अतिशय धाडसी, नेत्र दीपक प्रात्यक्षिके- खेळ सादर करून आपल्या अंगचे क्रीडाविषयक कौशल्य दाखविले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्स्फूर्त टाळ्यांच्या च्या गजरात पार पडले. क्रीडा विभाग प्रमुख रिया भिसे यांनी परिश्रमपूर्वक स्पर्धा नियोजन करून त्या उत्कृष्टपणे पार पडल्या. त्यांना प्रभारी प्राचार्य विनया लिंगस, सहकारी शिक्षक निलाक्षी चव्हाण,करुणा चिंदरकर, गौरी गावकर, श्वेता शिंदे, स्वरा तळेकर मदतनीस उर्मिला कुशे यांनी सहकार्य केले. यावेळी बहुसंख्य पालकांनी उपस्थित राहून आपल्या पाल्यांना प्रोत्साहन देत, क्रीडा स्पर्धेचा आनंद लुटला.

error: Content is protected !!