एससिआय संघटनेचे स्वयंसेवक आणि समर्थ आश्रमातील बांधवांचा मोहिमेत उत्स्फुर्त सहभाग
खारेपाटण (प्रतिनिधी): जीवन आनंद संस्थेच्या पुढाकारातून आणि सर्व्हिस सिव्हिल इंटरनँशनल (SCI) संघटना स्वयंसेवकांच्या सक्रीय सहभागातून नुकतीच विरार रेल्वे स्टेशनवर स्वच्छता मोहिम संपन्न झाली.या मोहिमेच्या सुरूवातीला राष्ट्रध्वज तिरंगी झेंड्याला सलामी देवून राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी “भारत माझा देश आहे…सारी धरती हे माझे घर आहे. माझी माता आहे”…ही भावना मनात घेवून स्वच्छता मोहिमेतील स्वयंसेकांनी जोरदार घोषणा दिल्या. भारत माता की जय..! वंदे मातरम..!! वंदे वसुंधरा..!!!. अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. एससिआयचे मुंबई उपनगर जिल्हा आणि वसई विरार भागातील स्वयंसेवक , पोलीस मित्र महाराष्ट्र संघटनेचे कार्यकर्ते व समर्थ आश्रमातील बांधव आणि कार्यकर्ते स्वच्छता मोहिमेत उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.

जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधार वंचिताचे पुनर्वसन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळण्यासाठी कार्यरत आहे.तर सर्व्हिस सिव्हिल इंटरनँशनल संघटना जगभर देशादेशांतील कलह दूर होवून जगभरातील माणसांना परस्परांच्या सोबतीने शांततापुर्ण जीवन जगता यावे यासाठी जगभरातील स्वयंसेवकांच्या सहभागाने समाजात सौहार्दाचे वातावरण निर्मितीसाठी कार्यरत आहे. विरार स्टेशनचे स्टेशन मँनेजर दयाराम यादव, एससिआयचे स्वयंसेवक जयप्रसाद, जनक गोर, शेहरबानू , रामराय महाडिक, राम अडसुळे यांचेसह पोलीस मित्र संघटना महाराष्ट्रचे सदस्यांची यावेळी प्रमुख उपस्थीती व सहभाग होता. तसेच नितीन वेंगुर्लेकर, संदिप परब, वैशाली कांबळे, शोभा डिसिल्वा, किसन चौरे, भाईदास माळी, हेमलता पवार, गोविंद मार्गी , दिपक नंदनवार, उज्वला मोरे, योगीता बोरसे,सुचिता पडवळ, संध्या, आशा भगत, वृषभ तटकरे,अलंकार शेडगे , आक्षय जंगम यांची कार्यक्रम संयोजनात महत्वाची भुमिका तर विरार स्टेशनचे प्रबंधक राजेश म्हात्रे, अफसर हुसैन व कर्मचारींचे सहकार्य लाभले.













