पुतण्याला चाकूने भोसकल्याच्या गुन्ह्यात चुलत्याला 3 वर्षे सश्रम कारावासासह दंड

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रागाच्या भरात सख्ख्या पुतण्याच्या पोटात चाकू खुपसून गंभीर जखमी करून खून करण्याच्या प्रयत्न सुभाष श्रीधर माधव ( रा. पोईप , ता मालवण ) याने केला होता.हा खुनी हल्ला 20 मे 2017 रोजी केला होता.सुभाष माधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या सुनावणीत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर आरोपी सुभाषचा गुन्हा शाबीत झाला होता. या केस चा निकाल देताना जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्री. संजय भारुका यांनी आरोपी सुभाष माधव याला 3 वर्षे सश्रम कारावासासह 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली./
या गुन्ह्याचा यशस्वी तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक बोडके, हवालदार व्हि डी जोशी यांनी केला होता. आरोपीने रागाच्या भरात गुन्हा केलेला होता. सदर गुन्ह्यात सरकारतर्फे महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आलेले होते. अचानक रागाच्या भरात आरोपिकडून गुन्हा घडल्याचे पुराव्यात दिसून आल्याने आरोपी विरुद्ध कलम 326 अन्वये गुन्हा शाबीत झाल्याने आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री भारुका साहेब यांनी दोषी धरले व आरोपीला भादवि कलम 326अन्वये 3 वर्ष सश्रम करावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.सदर केसच्या सुनावणीवेळी साक्षीदारांना उपस्थित ठेवण्याकरता , पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील व यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!