चिंदर येथे 17 उज्वला गॅस (इण्डेन) कनेक्शन वितरण….!

चिंदर ग्रामपंचायत व ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांचे विशेष प्रयत्न

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग कृषी औद्योगिक सर्व सेवि संस्था मर्यादित सिंधुदुर्ग व इण्डेण गँस एजन्सी मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान उज्वला गँस 17 लाभार्थ्यांना भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरपंच नम्रता महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वै, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांच्या हस्ते शनिवार 16 डिसेंबर रोजी वितरीत करण्यात आली. तसेच अनेक जनांची KYC पण करण्यात आली.

यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर म्हणाले की, चिंदर गावातील प्रत्येक वाडीत इण्डेण गँस कनेक्शन धारकाला सिलेंडर घरा जवळ नेता यावा यासाठी इण्डेण गँस एजन्सी तर्फे वाहनाची सोय करण्याचा आपला प्रयत्न राहिल.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य जान्हवी घाडी, सानिका चिंदरकर, शशिकांत नाटेकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, मंगेश गांवकर, अरविंद घाडी, माजी सभापती हिमाली अमरे, मँनेजर सदानंद मयेकर, गँस एजन्सी कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!