अवघ्या दोन तासांत चोरीस गेलेल्या दुचाकीसह चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

सिंधुदुर्ग एलसीबी ची कौतुकास्पद कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील पेडणेकर ज्वेलर्स समोरून 19 डिसेंबर रोजी चोरीस गेलेल्या ऍक्टिव्हा दुचाकीसह चोरटा किशोर मारुती खरात ( वय 23, रा. नाटळ, ता कणकवली ) याला सिंधुदुर्ग एलसीबी चे उपनिरीक्षक आर बी शेळके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या दोन तासांत शिताफीने कुडाळ तालुक्यातील अणाव गावात पकडले. वायरी मालवण येथील मयेकर दाम्पत्य 19 डिसेंम्बर रोजी भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी कणकवलीत आले होते. भालचंद्र महाराजा मठात दर्शन घेतल्यानंतर अस्मिता मयेकर व त्यांचे पती त्यांच्या मालकीची ऍक्टिव्हा दुचाकी (MH 07 – AL – 5204 ) पेडणेकर ज्वेलर्स शो रूम सायंकाळी समोर पार्क केली होती. मात्र त्यानी ऍक्टिव्हा ची चावी गाडीलाच लावून ठेवली होती.या संधीचा फायदा घेत चोरटा किशोर खरात याने ऍक्टिव्हा चोरून नेली होती. ऍक्टिव्हा चिरतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. या चोरीची फिर्याद मयेकर यांनी 20 डिसेंम्बर रोजी सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. चोरीची फिर्याद दाखल झाल्यानंतर एसपी अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक आर बी शेळके यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी पोलीस हवालदार राजेंद्र जामसंडेकर, किरण देसाई, आशिष जमादार यांच्या पथकाने शिताफीने चोरटा किशोर खरात याला ऍक्टिव्हा दुचाकीसह अणाव गावातून ताब्यात घेतले. चोरीस गेलेली दुचाकी व आरोपी किशोर खरात याला कणकवली पोलिसांचा हवाली केले असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहे.

error: Content is protected !!