कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता रघुनाथ शिवराम प्रभूखानोलकर (82)यांचे आज शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. जिल्ह्यातील ठेकेदार संदीप प्रभूखानोलकर यांचे ते वडील होत. सार्वजनिक बांधकाम विभागा मधून उपकार्यकारी अभियंता या पदावर सेवा बजावून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता कणकवलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे वडील आर. डी. सामंत यांचे ते मेहुणे होत.
शासकिय ठेकेदार संदीप प्रभूखानोलकर यांना पितृशोक












