मोबाईल चोराच्या काही तासांतच वैभववाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वैभववाडी (प्रतिनिधी) : आज आठवडा बाजारा दिवशी वैभववाडी शहरातील एका मोबाईल शॉपीमध्ये नवीन मोबाईल खरेदी करण्याच्या बहाण्याने एक इसम गेला होता. दुकानदाराची नजर चुकवून त्याने मोबाईल शॉपीमधील मोबाईल चोरला सदर घटना काही दुकानातील सी.सी.टि.व्ही. फुटेज च्या माध्यमातून दुकानदाराच्या लक्षात आली त्याने तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार वैभववाडी पोलिस प्रशासनाचे तात्काळ सदर व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही तासांतच मोबाईल चोरणाऱ्या व्यक्तीला मोबाईल सह आपल्या ताब्यात घेतले. वैभववाडी पोलिस प्रशासनाच्या या तात्काळ कारवाई बाबत सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!