रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगड आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

देवगड (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ मँन्गोसिटी देवगड यांच्यावतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्फुर्तपणे 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रोटरी क्लब ऑफ मँन्गोसिटी देवगड यांचा पहिलाच सदरचा उपक्रम असून या उपक्रमाला रक्तदात्यांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला आहे. यामुळे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान याचा प्रत्यय येथे आला आहे.

या रक्तदान शिबिरामध्ये जिल्हा रुग्णालय रक्तपेढी आरोस येथील डॉ.आरती महात्मे,स्टाफ प्रांजली परब, टेक्नीशियन नतिशा मॅडम,श्रीयुत आडकर, डोंगरे,वाहन चालक गांवकर या टिमचा सहभाग होतायावेळी रोटरी क्लब ऑफ मँन्गोसिटी देवगडचे अध्यक्ष श्रीपाद पारकर, संजय धुरी, गौरव पारकर,दयानंद पाटील,अनिल गांधी,मनस्वी घारे,अनिल कोरगावकर,अनिकेत बांदिवडेकर,नरेश डामरी, सिंधुरक्त प्रतिष्ठानचे उध्दव गोरे,रविकांत चांदोस्कर,प्रकाश जाधव,जोशी, आदी उपस्थित होते.
विशेषता करुन या रक्तदान शिबिरामध्ये महिलांचा उत्फर्तपणे सहभाग जास्त प्रमाणात होता. रोटरी क्लब ऑफ मँन्गोसिटी देवगड यांच्यावतीने अनेक समाजउपयोगी विविध कार्यक्रम राबविले आहेत. शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी या संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे.

रोटरी क्लब ऑफ मँन्गोसिटी देवगड यांच्यावतीने अनेक नवनवीन उपक्रम राबविण्याचे कार्य सुरु असून रक्तदान सर्व श्रेष्ठ दान असे मानले जाते याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ मँन्गोसिटी देवगड यांच्यावतीने इंद्रप्रस्थ हॉल देवगड येथे रक्तदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान उपक्रमामध्ये तालुक्यातील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

error: Content is protected !!