फोंडघाट (प्रतिनिधी) : नवी कुर्ली वसाहत येथील एकनाथ नारायण चव्हाण यांनी दुकानाचे नवीन शटर लावण्यासाठी आणलेले १० हजार रुपयांचे साहित्य अज्ञातांने चोरून नेले. या प्रकरणी एकनाथ चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजता ते रविवारी सकाळी ८ वाजता या दरम्यान घडली. एकनाथ चव्हाण यांनी कोल्हापूर येथून शटरचे साहित्य आणले होते. त्यांनी हे सर्व साहित्य घराच्या बाजूला दुकानासमोर ठेवले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने हे साहित्य चोरून नेले. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रवी शेगडे करत आहेत.
10 हजार रुपयांचे शटर साहित्य चोरीस; नवीन कुर्ली वसाहत येथील घटना











