कुडाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भोंगळ कारभाराची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय महाविद्यालयात धडक देऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या या परिस्थितीला डीन डॉ ,सुनीता रामानंद याच जबाबदार असून एक महिन्यात वैद्यकीय महाविद्यालयाची दयनीय परिस्थितीत मध्ये सुधारणा झाली नाही तर डिनच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता,वैद्यकीय महाविद्यालयाच्या भोंगळ कारभाराला सर्वस्वी रामानंद याच जबाबदार होत्या त्यांच्या बेजबाबदार कारभाराला वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्मचारी वर्गांबरोबरच जनतेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला,यांची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून डीन यांना घेराव आंदोलन करुन शासनाने याची दखल घेण्यास भाग पाडले होते, शासनस्तरावर यांची दखल घेत अखेर आज डीन डॉ,सुनीता रामानंद यांच्याकडील कार्यभार काढून घेत,त्या जागी डॉ,मनोज जोशी यांची नियुक्ती करण्यात आली, यापूढे सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार डॉ मनोज जोशी यांनी व्यवस्थित सांभाळून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला या वैद्यकिय कारभार सुधारण्यास चालना मिळेल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ,रामानंद यांची बदली ; अमित सामंत












