आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांचे मार्गदर्शन
आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा हे अभियान काल पासून सुरु होऊन २४ जानेवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे.ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा अभियान अंतर्गत आचरा पोलिस ठाणे कडून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या नेतृत्वाखाली आचरा हद्दीतील कर्नाटक येथून डांबरी रस्त्याचे काम करण्यासाठी आलेल्या कुटुंबास शारीरिक थकवा दूर करण्यासाठी विविध कमी किंमतीत उपलब्ध होणाऱ्या व्यसनानमुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामा बाबत ‘आम्ही सोबत आचरा सामाजिक संस्था प्रतिनिधी’ अभय भोसले यांच्या सोबत मार्गदर्शन करून त्यांना जीवनावश्यक खाद्यपदार्थ देण्यात आले.यावेळी आचरा ग्रामोपाद्याय निलेश सरजोशी, पोलीस पाटील विठ्ठल धुरी, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, सचिन हडकर, विठ्ठल गावकर, गुरु कांबळी, दीपक सावंत तसेच आचरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आदी उपस्थित होते.