कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी, कणकवली महाविद्यालयात बुधवार , दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी, “इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि एम्बेडेड सिस्टम” या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले. प्रोलिफिक प्रशिक्षण केंद्र, पुणे चे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. विवेक सरडाल यांनी नवीन इंडस्ट्रियल ऑटोमेशन, रोबोटिक्स, एम्बेड सिस्टम आणि पीएलसी या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच नवीन औद्योगिक संकल्पना, आवश्यक ज्ञान आणि औद्योगिक पैलू, बदलणारे आणि उदयोन्मुख औद्योगिक मार्ग या विषयांवर प्रकाश टाकला. सेमिनारचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा. नितीन सावंत ( इलेक्ट्रिकल विभाग ) आणि प्रा. कल्पेश कांबळे ( मेकॅनिकल विभाग ) यांनी केले. प्रा. डॉ. रावसाहेब ठोंबरे ( इलेक्ट्रिकल विभागप्रमुख ) व प्रा. सचिन वंजारी ( मेकॅनिकल विभागप्रमुख ) यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी एस एस पी एम संस्थेचे संस्थापक केंद्रीय उद्योगमंत्री मा. नारायण राणे, अध्यक्षा निलमताई राणे, उपाध्यक्ष माजी खासदार निलेश राणे, सचिव आ. नितेश राणे, प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे, प्र. प्राचार्य डॉ. महेश साटम, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहित केले.
इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि एम्बेडेड सिस्टम सेमिनार कणकवली महाविद्यालयात











