शिष्यवृत्ती परीक्षेत त्रिंबक हायस्कूलच्या मंजिरी जाधवचे घवघवीत यश…!

अनुसूचित जाती प्रवर्गात मालवण तालुक्यात प्रथम

आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूलने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेची विद्यार्थिनी कु. मंजिरी गणेश जाधव हिने अनुसूचित जाती प्रवर्गात मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत आपल्या गुणवत्तेची चमक दाखवून दिली.

मंजिरी जाधव हिच्या या उल्लेखनीय यशामुळे जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे तिने हे यश संपादन केले.

मंजिरीच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सुरेंद्र सकपाळ, कार्यवाह अरविंद घाडी, अशोक बागवे, संस्थेचे पदाधिकारी व संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर तसेच शिक्षक एकनाथ गायकवाड, प्रशांत गोसावी, महेंद्र वारंग, अभिजित धुरे, संतोष मेस्त्री आणि बौद्ध विकास मंडळ, त्रिंबक यांच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!