ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच पुण्यात निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास

ब्युरो न्युज (पुणे) : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी प्रभा अत्रे यांनी अखेरचा श्वास घेतला. जेष्ठ शास्त्रीय संगीत गायिका प्रभा अत्रे यांच पुण्यातील राहत्या घरी पहाटे निधन झाल आहे. प्रभा अत्रे यांना पहाटे झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या आधीच त्यांच निधन झाल होतं. प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आल होतं.

पहाटे झोपेत असताना प्रभा अत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या आधीच त्यांचं निधन झाल होतं. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान केला आहे. तसेच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!