मागील दीड वर्ष अनुसूचित जाती जमाती आयोग अध्यक्षपद रिक्त
शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांची टीका
कणकवली (प्रतिनिधी) : गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगा अध्यक्ष पद रिक्त असून अद्याप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे आयोगाची निर्णयप्रकिया ठप्प आहे. आयोग कोणत्याही प्रकरणात सुनावणी घेऊ शकत नाही. त्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींना न्याय मिळण्याचा मार्गच उरला नाही. आयोगामार्फत SC/ ST ना मोफत व जलद न्याय मिळतो. मात्र अध्यक्ष नसल्याने त्यांना न्याय मिळण्याचा मार्गच बंद झाला आहे. आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. आयोग हा भारतीय संविधानानुसार स्थापन झाला आहे. त्याला घटनात्मक दर्जा आहे. अश्या परिस्थितीत आयोगाचे अध्यक्षपद दीर्घकाळ रिक्त ठेवणे उचित नाही अशी टीका शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी केली आहे.











