कनकसंध्याचा परफॉर्मन्स ठरला यादगार

कणकवली पर्यटन महोत्सवात स्थानिक कलाकारांच्या अदाकारीने ऑडियन्स खूश

कणकवली (प्रतिनिधी) : पदर महिला प्रतिष्ठान व स्थानिक कलाकारांच्या कनकसंध्या कलाविष्काराने कणकवली पर्यटन महोत्सवाची दुसरी रात्र अविस्मरणीय ठरली. ३००हून अधिक स्थानिक कलाकारांचे नृत्य, नाट्य, संगीत, कॉमेडी अशा बहुरंगी कार्यक्रम पाहण्यासाठी कणकवलीकरांनी मोठी गर्दी केली होती.
पदर महिला प्रतिष्ठानने भारतातील विविध प्रांतात लोकसंस्कृतीची नृत्य व विविध मुलांमध्ये जाणीव करून दिली. यामध्ये गुजराती राजस्थानी दक्षिण प्रांतातील तसेच कोकण प्रांतातील संस्कृती नृत्यातून दाखवली. जिल्हा परिषद शाळेतील व अन्य प्रशालेमधील लहान मुलांनी उत्कृष्ट नृत्य आविष्कार सादर केले. आयडियल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दक्षिण भारतातील वेशभूषा करून त्या प्रांतामधील विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. ‘झुंजूमुंजू सांज झाली’ या गाण्यावर नृत्य सादर करून कोकणातील संस्कृती दाखवण्यात आली. त्याचबरोबर पदर प्रतिष्ठानच्या महिलांनी जगभरात साजरे होणारे सण नृत्यातून दाखवण्यात आले. माऊलीचा गजर करत वारकरी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाताना चे दृश्य दाखवण्यात आले. तसेच नागपंचमी, कोळीगीतातून नारळी पौर्णिमा, ‘सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला’ या गाण्याने गणेश चतुर्थी, मंगळागौर, ‘तू ग दुर्गा तू भवानी’ या गाण्यातून नवदुर्गांच्या दर्शन घडवले. दिवाळी, हळदीकुंकू, कोकणात शिमगात्सव कशाप्रकारे साजरा होतो हे ‘आमच्या दाराशी हाय शिमगा’ या गाण्यातून दाखवण्यात आले. पदर महिला प्रतिष्ठानच्या सर्व कार्यक्रमांचे निवेदन राजेश कदम यांनी केले.

प्रभू श्रीराम हे आपली पत्नी सीता, भाऊ लक्ष्मण व हनुमान यांच्यासमवेत वनवासातून आल्यानंतर कशाप्रकारे अयोध्यामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली ते ‘अयोध्या सजली’ या गाण्यातून सादर करण्यात आले. त्यानंतर ठोलताशाच्या गजरात प्रभू श्री राम यांच्या सहित स्थानिक कलाकारांनी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर सुहास वरुणकर यांनी गाऱ्हाणे घालुन व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते नारळ वाढवून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडु हर्णे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगरसेविक मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, प्रतीक्षा सावंत माजी नगरसेवक अजय गांगण, शहरअध्यक्ष अण्णा कोदे, कंझूमर सोसायटी चेअरमन संदीप नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते. ३०० कलाकारांच्या समवेत सुहास वरूणकर, हरिभाऊ भिसे आणि संजय मालंडकर यांनी नांदी गीत रंगभूमीला समर्पित कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्थानिक कलाकारांमधील नेहा आणि समृद्ध यांनी नटरंग या चित्रपटातील ‘नटरंग उभा’ हे गाणे गात नृत्याविष्कार सादर केला. ‘रिद्धी सिद्धी रिद्धी होती’ या गाण्यावर नृत्य सादर करून गणपतीला मानवंदना दिली. धीरेश काणेकर यांनी आपल्या बुलंद आवाज येतो ‘देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया’ हे गाणं सादर केल.

‘प्यार होता कही बार है’ आणि ‘गलतीसे मिस्टेक’ या गाण्यांवर स्थानिक कलाकारांमधील लहान मुलांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. मृणाल सावंत हिने जग घुमया या गाण्यावर उत्कृष्ट कथक नृत्य सादर केले. तर नंदिनी हिने अगबाई हल्ला मचाये या गाण्यावर बॅले डान्स सादर करून प्रेक्षकांना घायाळ केले. त्यानंतर नेहा आणि धीरेश यांनी ‘बहरला हा मधुमास नवा’ हे ट्रेडिंग गीत सादर केले. सौरव याने एक आगळावेगळा नृत्यप्रकार सादर केला. यात त्याने ‘भुताने झपाटले’, ‘कोंबडी पळाली’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘झिंगलाय झिंगलाय ग’ या गाण्यांवर नृत्य सादर केले. यादरम्यान हळदी नृत्यातून हळदीमध्ये होणारे गमतीजमती दाखवण्यात आल्या. होंठों में ऐसी बात मैं दबाके चली आई, गजरा मोहब्बत वाला, परदेसिया यह सच है पिया, हवाहवाई या गाण्यांवर रेट्रो नृत्य सादर केले. हेमांगी जाधव ‘आली ठुमकत नार लचकत’ या गाण्यावर लावणी नृत्य सादर करून प्रेक्षकांना आपल्या अदाकारीने घायाळ केले.

error: Content is protected !!