इंडियन आयडॉल फेम गायकांसोबत समीर नलावडेंच्या परफॉर्मन्स ने रसिक बेहद्द खुश
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पर्यटन महोत्सवाच्या तिसरा दिवशी इंडियन आयडॉल फेम सायली कांबळे, आशिष कुलकर्णी, निहाल तौरो यांच्या मराठी व हिंदी गीतांचा सुमधूर गायनाच्या ‘लाईव्ह परफॉर्मन्स’ने रसिकांची मने जिंकली. सायली, आशिष, निहालच्या गायनावर तरुणाई चिकरली अन् रसिकांनी आपल्या मोबाईलची टॉर्च ऑन करून उत्स्फूर्त दाद दिली. या सांगीतिक कार्यक्रमाच्या सर्वांगसुंदर सादरीकरणामुळे शनिवारीची रात्र कणकवलीकारांसाठी अविस्मरणीय ठरली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी रसिकांची अलोट गर्दी झाली होती.
या कार्यक्रमात सायली, आशिष, निहाल यांनी हिंदी व मराठी गाणी सादर करत संगीताच्या तालावर बच्चे कंपनी, तरुणाईसह कणकवलीकारांना डोलायला लावले. सायली हिने ‘जरा परेशान’, ‘हमारी अधुरी कहाणी’, ‘बाहो मै चले आ’, ‘कमी कभी मेरे दिले मै’, ‘अजीब दास्ताँ है’, ऐ श्याम मस्तानी’, ‘ऐ दिल काहा तेरी मंजिल’, ‘पल पल दिल के पास’, ‘पहिला नशा… पहिला खुमार, ‘लैला यो लैला’, चंद्रमुखी’, ‘चांदणी की रात्र’, पिया तु अब तो आजा’, ‘दम मारो दम यासह हिंदी व मराठी गाण्यांचे सादरीकरण करत सायली हिने आपल्या आवाजाची मोहीम रसिकांवर घातली.
आशिष कुलकर्णी याने ‘मायेच्या हळव्या, स्पशनि खुलते’, ‘तु हिरे, तु हिरे, ‘मौसम मौसम था सुहाना बछा मौसम’, सौराट चित्रपटातील ‘याड लागले’, ‘जीव रंगला’, ‘देखा ना, सोचा ना’, ‘बचना ए हसिनो’, ‘कही के पान बनासर वाला’, ‘रंग बदल रहे तितलिया, ‘ओ दिवानी’, ‘मेरे सपनो कि राणी कब आयेगी’, ‘यमला पगला दिवाना यासह मराठी व हिंदी गाणी गात रसिकांची मने जिंकली. निहाल तौरो यांनी मराठी व हिंदीतील गाणी गात रसिकांची वाहवा मिळवली अन् आपल्या गायनावर तरुणाईला चिरकवले. सायली व आशिष याने ‘सैराट’ चित्रपटातील गाणी गाऊन तरुणाईला थिरकवले अन् सैरायमय केले. त्यानंतर या तिन्ही गायकांनी ढोल बाजे यासह मराठी व हिंदी गाण्याचे एकत्रितरित्या गायन करून तरुणाईसह रसिकांना बेधुंद करून सोडले. सायली, आशिष, निहाल यांनी सादर कलेल्या प्रत्येक सुमधूर गाण्याला रसिकांची वाहवा मिळली अन् रसिकांनी आपल्या मोबाईलची टॉर्च लावून गायकांचा उत्साह वाढवला. शेवटी या गायकांनी ‘सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हमपर डालो चाहे जितना जोर लगालो सबसे आगे होगे हिंदुस्थानी हे गीत गात देशभक्ती जागवली.