मैत्री गृप कांदिवली यांचेकडून समर्थ आश्रमातील बांधवांना जीवनोपयोगी साहित्य भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई कांदिवली येथील मैत्री गृपच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच विरारफाटा येथील जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमला भेट देवून येथील निराधार बांधवांना जीवनावश्यक वस्तू व साहित्य भेट दिले.मैत्री गृप च्या २२ स्री-पुरूष सदस्यांनी त्यांच्या रोजच्या व्यस्त जीवनातून रविवार हा दिवस राखून ठेवला होता.या समुहातील स्री-पुरूष व युवा सदस्यांनी पालघर जिल्ह्यातील सेवाभावी संस्थाना प्रत्यक्ष भेट देवून त्या त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची गरज समजून घेवून वस्तू प्रदान केल्या.

तर समर्थ आश्रम साठी त्यांनी स्वच्छतेचे साहित्य,साखर,चहापावडर आश्रमातील भगीणींना स्वेटर व सर्व बांधवांना संक्रातीनिमित्ताने तिळगुळ मिठाई व मेथीचे लाडू वाटप केले.मैत्री गृप गेली दहा वर्षे सातत्याने अनाथाश्रम,वृध्दाश्रमांसह विटभट्टीवर उघड्यावरचे जीवन जगणारे बांधव व मुले यांना आवश्यक वस्तू व शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांचे सहाय्य करीत आसल्याची माहिती मैत्री गृपचे अतुलभाई डेढिया व निलेश शहा यांनी यावेळी दिली. जीवन आनंद संस्थेच्या वतीने मैत्री ग्रुप कांदीवलीच्या सर्व ग्रुप सदस्यांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!