कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कणकवली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मातोश्री वृद्धाश्रम सांगवे-भिरवंडे येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावर्षी च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराची थीम युवकांचा द्यास-ग्रामशहर विकास अशी ठेवण्यात आली होती.या मध्ये जलसंधारण ,कन्या बचाव,कृत्रिम संगणकीय बुद्धिमत्ता,विज्ञानिक दृष्टिकोन,आरोग्य विषयी जनजागृती,इत्यादी बाबी समाविष्ट केलेल्या आहेत.या कार्यक्रमात सांगावे गावचे सरपंच संजय सावंत व सांगवे गावचे उपसरपंच प्रफुल्ल काणेकर यांना आमंत्रित केले होते.व त्यांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रतिनिधी मंदार कुलकर्णी, इंद्रागोपल बिल्ले,सिद्धी सुतार,आणि वैष्णवी उगवेकर यांनी केले. दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कणकवली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन वृध्दाश्रम सांगवे-भिरवंडे येथे करण्यात आले आहे.सांगवे गावचे सरपंच व उपसरपंच, प्राध्यापक अरविंद विजय कुडतरकर, प्राध्यापक डॉ शुभांगी तानाजी माने, आणि वैभव यादव सर यांच्या उपस्थितीत उधघाटनांचा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन १४ जानेवारी २०२४ ते २० जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या समाजोपयोगी बंधारे बांधणी उपक्रमाला व इतर विविध उपक्रमांना सहकार्य करू असे आश्वासन सरपंच आणि उपसरपंच यांनी दिले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या निवासी श्रमसंस्कार शिबिराला त्यांनी बहुमूल मार्गदर्शन केले व खूप शुभेच्छा दिल्या.महाविद्यालचे प्राचार्य डॉ. महेश साटम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे संयोजन केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.अरविंद कुडतरकर,डॉ.एस.टी.माने आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंसेवक इंद्रगोपाल बिल्ले व मंदार कुलकर्णी, मुज्जुमिल शेख यांनी केले. या शिबिराचा पहिल्या दिवशी दुपारी आश्रम परिसरात स्व्छता मोहीम राबवली व सायंकाळी कृत्रिम बुद्धिमत्ता चे फायदे व नुकसान या विषयावर विद्यार्थ्यांनी चर्चा केली.कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कणकवली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मातोश्री वृद्धाश्रम सांगवे-भिरवंडे येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावर्षी च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराची थीम युवकांचा द्यास-ग्रामशहर विकास अशी ठेवण्यात आली होती.या मध्ये जलसंधारण ,कन्या बचाव,कृत्रिम संगणकीय बुद्धिमत्ता,विज्ञानिक दृष्टिकोन,आरोग्य विषयी जनजागृती,इत्यादी बाबी समाविष्ट केलेल्या आहेत.या कार्यक्रमात सांगावे गावचे सरपंच संजय सावंत व सांगवे गावचे उपसरपंच प्रफुल्ल काणेकर यांना आमंत्रित केले होते.व त्यांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रतिनिधी मंदार कुलकर्णी, इंद्रागोपल बिल्ले,सिद्धी सुतार,आणि वैष्णवी उगवेकर यांनी केले.
दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कणकवली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन वृध्दाश्रम सांगवे-भिरवंडे येथे करण्यात आले आहे.सांगवे गावचे सरपंच व उपसरपंच, प्राध्यापक अरविंद विजय कुडतरकर, प्राध्यापक डॉ शुभांगी तानाजी माने, आणि वैभव यादव सर यांच्या उपस्थितीत उधघाटनांचा कार्यक्रम पार पडला.
राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन १४ जानेवारी २०२४ ते २० जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या समाजोपयोगी बंधारे बांधणी उपक्रमाला व इतर विविध उपक्रमांना सहकार्य करू असे आश्वासन सरपंच आणि उपसरपंच यांनी दिले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या निवासी श्रमसंस्कार शिबिराला त्यांनी बहुमूल मार्गदर्शन केले व खूप शुभेच्छा दिल्या.महाविद्यालचे प्राचार्य डॉ. महेश साटम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे संयोजन केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.अरविंद कुडतरकर,डॉ.एस.टी.माने आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंसेवक इंद्रगोपाल बिल्ले व मंदार कुलकर्णी, मुज्जुमिल शेख यांनी केले. या शिबिराचा पहिल्या दिवशी दुपारी आश्रम परिसरात स्व्छता मोहीम राबवली व सायंकाळी कृत्रिम बुद्धिमत्ता चे फायदे व नुकसान या विषयावर विद्यार्थ्यांनी चर्चा केली.












