युवा संदेश प्रतिष्ठान जिजाऊ संस्था आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा ४ फेब्रुवारी रोजी

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान व जिजाऊ संस्था महाराष्ट्र यांच्यावतीने सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2024 रविवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी ११.०० ते १.०० यावेळेत आयोजित करण्यात आली आहे.हे परिक्षेचे ७ वे वर्ष असून सिधुदुर्ग जिल्ह्यात २६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हातून १०,४६७ विद्यार्थ्यानी नोंदणी केली असूनप्रत्येक इयत्तेतील पाहिल्या ५० अशा २५० गुणवंत विद्यार्थ्यांना अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके ,सन्मानचिन्ह,मेडेल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच 4 थी,6वी व 7 वी या प्रत्येक इयत्तेतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) या संस्थेला व २ री, ३री, च्या टॉप फाईव विद्यार्थ्याना गोवा येथील सायन्स सेंटर ला भेटी साठी घेऊन जाण्यात येणार आहे.

या परीक्षेचे मुख्य परीक्षा केंद्रे – कणकवली कॉलेज, कणकवली असून इतर परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे
@ फोंडा हायस्कूल
@ जी प शाळा खारेपाटण न १
@ वामनराव महाडिक विद्यालय,तरेळे
@ शिरगाव हायस्कूल
@ शाळा जामसंडे न १,देवगड
@ शाळा कुणकेश्वर न १, देवगड
@ पडेल हायस्कूल, पडेल
@ रामगड हायस्कूल
@ आचरा हायस्कूल
@ टोपीवाला हायस्कूल,मालवण
@ वराडकर हायस्कूल कट्टा
@ कुडाळ हायस्कूल,कुडाळ
@ न्यू इंग्लिश स्कूल कसाल
@ वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव
@ RPD हायस्कूल ,सावंतवाडी
@ सैनिक स्कूल,आंबोली
@ जि प शाळा माडखोल न १
@ जि प शाळा मळेवाड न १
@जि प शाळा सांगेली
@ जि प शाळा मळगाव
@ खेमराज हायस्कूल,बांदा
@ दोडामार्ग इंग्लिश स्कूल, दोडामार्ग
@ न्यू इंग्लिश स्कूल भेडशी
@ वेंगुर्ला हायस्कूल
@अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी

उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली जाणार आहे. तसेच . त्याच प्रमाणे निकाला दिवशी पालक/शिक्षक/विद्यार्थी यांना निकाल व सोडवलेली उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे. यावर्षी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी , पालघर व ठाणे जिल्हात आयोजित करण्यात आली आहे.

युवा संदेश प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि अध्यक्षा संजना संदेश सावंत,(माजी जी प अध्यक्ष) यांनी सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) परीक्षा 2024 साठी सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या असून अधिक माहितीसाठी STS परीक्षा प्रमुखसुशांत सुभाष मर्गज(९४२०२०६३२६)यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!