27 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान सहलीचे आयोजन
सलग 5 व्या वर्षी भक्तपर्यटकांसाठी माफक दरात सहलसेवा
कणकवली (प्रतिनिधी) : साईबाबा सोशल क्लब च्या वतीने भक्त पर्यटकांसाठी माफक दरात कणकवली शिर्डी शिंगणापूर रांजणगाव महागणपती अशी 3 दिवसीय सहल 27 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. 27 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजता लक्झरी बस कणकवलीतून थेट शिर्डी ला निघणार असून तिथून शनी शिंगणापूर दर्शन, अष्टविनायकपैकी रांजणगाव चा महागणपती दर्शन करून 29 जानेवारीला रात्री कणकवलीत बस परतणार आहे. प्रवासासाठी आरामदायी लक्झरी बस ची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून केवळ 1 हजार शुल्कामध्ये 3 दिवस चहा नाष्टा जेवण यासह निवास सुविधा पुरवली जाणार आहे. अधिक माहितीसाठी संतोष राणे मोबा. 9420121330 ,हनुमंत बोंद्रे मोबा. 8805965999 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन साईबाबा सोशल क्लब च्या वतीने करण्यात आले आहे.












