जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांनी दिली खारेपाटण किल्ला येथे सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मोहन दहीकर हे शुक्रवार दि.२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायं. ५.३० वाजता खारेपाटण पोलिस आउट पोस्ट येथे प्रशासकीय कार्यालयीन तपासणी कामाच्या निमित्ताने आले असता त्यांनी खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्याला सदिच्छा भेट दिली. व संपूर्ण किल्ला परिसराची पाहणी केली.

यावेळी त्यांच्या समवेत कणकवली तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव, API श्री भोसले यांसह जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयीन पोलिस कर्मचारी उपस्थित होते. खारेपाटण येथे जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांची पहिलीच भेट असल्याने खारेपाटण पोलिस चेक पोस्ट तसेच खारेपाटण पोलिस आउट पोस्ट कार्यालयाला त्यांनी भेट देऊन त्याची पाहणी केली. यावेळी खारेपाटण पोलिस दुरशेत्राचे पोलिस प्रमुख हवालदार मिलिंद देसाई, कॉन्स्टेबल सुनील निकम उपस्थित होते. यांचेशी चर्चा करून येथील दप्तरी कामकाजाचा आढावा घेतला.

यादरम्यान खारेपाटण गावचे माजी सरपंच रामकांत राऊत तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांची भेट घेऊन खारेपाटण येथील पडझड झालेल्या ब्रिटिशकालीन पोलिस स्टेशनची इमारत नव्याने बांधण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी दहिकर साहेब यांनी खारेपाटण येथील प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ल्याला भेट दिली. व येथील संपूर्ण परीसराची पाहणी केली. यावेळी संतोष पाटणकर यांनी या ऐतिहासिक किल्ला बाबत येथील सन आणि उत्सवा बाबत जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांना विस्तृत माहिती दिली.

error: Content is protected !!