कोळोशीत दुष्काळग्रस्त शेतीच्या पाहणीसाठी सभापती हर्षदा वाळके शेतकऱ्यांच्या बांधावर

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती कणकवलीच्या वतीने कोळोशी गावातील दुष्काळग्रस्त शेती पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पंचायत समिती कणकवलीच्या सभापती हर्षदा वाळके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची सद्यस्थिती तसेच दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी सुधाकर इंदप, नारायण दिवाटणे, सुचिता पोकळे, सत्यवान राणे, चंद्रकांत इंदप, अनंत आचरेकर, सुरेश कदम, सोमा कदम, चंद्रकांत शिंदे, सानिका इंदप आणि मंगेश इंदप या शेतकऱ्यांच्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पावसाअभावी शेती पिकांवर झालेला परिणाम, पिकांची सद्यस्थिती तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती सभापती हर्षदा वाळके यांनी जाणून घेतली.

दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी व नोंद घेण्याचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

या पाहणीवेळी कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, उपसरपंच अतुल गुरव, ग्रामपंचायत सदस्य सुचिता पोकळे, सुशील इंदप, सिद्धार्थ तांबे तसेच ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे उपस्थित होते.

error: Content is protected !!