कणकवलीत ४ ऑक्टोबर रोजी ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’

स्वर्गानंद टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सच्या वतीने डॉ. वैशाली कोरगांवकर व गीता कामत यांचे निमंत्रण

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निलायम कृष्णकक्ष हळवल, कणकवली येथे रविवारी ०४ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ हा सुप्रसिद्ध अभिवाचन अनुभव कार्यक्रम संपन्न होत आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना व संहिता लेखन ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांची असून या कार्यक्रमात आजी – वैशाली पंडित, आजोबा – संजय शिंदे, सूत्रधार – अक्षय सातार्डेकर, सहकलाकार – डॉ. सुमेधा नाईक व तालवाद्य – वैभव मांजरेकर या कलाकारांचा सहभाग आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वर्गानंद टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सच्या डॉ. वैशाली कोरगांवकर व गीता कामत यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२०४३०२५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!