दुष्काळात कलमठ गाव एकवटला

ग्रामपंचायतने आयोजित केली जनसंवादाची बैठक

लोक सहभागातून दुष्काळाला सामोरे जाणार

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत मध्ये जल व्यवस्थापन आणि ग्रामस्वच्छता या विषयांवर चर्चा करण्यासाठी सरपंच संदिप मेस्त्री यांच्या संकल्पनेतून ग्रामसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. असलेला दुष्काळ, येऊ घातलेले पाणी संकट, कचरा व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा आज कलमठ ग्रामस्थांनी केली. महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त गावाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी चर्चा करताना अनेक सूचना मांडल्या त्यामध्ये पाणी बचत करताना पाण्याचा योग्य वापर, गावात असलेल्या मुख्य पाण्याच्या स्रोत मध्ये कच्चे बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले, बंद घरांच्या पाणी पुरवठा बंद करणे, नदी आणि सार्वजनिक विहिरीमध्ये असलेले खाजगी पंप धरकांना एक दिवस आड पाणी उपसा करावे असे सुचवण्यात आले, नळयोजना मधून होणारा डिसेंबर पर्यंत १५ मिनिटांनी कमी करणे, गावात असणाऱ्या सर्व्हिसिंग सेंटर चालकांना पाणी जपून वापरण्याची सूचना मांडण्यात आली. लोकसहभागाने गावातील बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले, यासाठी गावातील उद्योजकांनी यासाठी मोफत यंत्र सामुग्री उपलब्ध करून देऊ असे सांगितले. गावातील सार्वजनिक मंडळे, सी.आर.पी, शिक्षक वृंद, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते,पोलीस पाटील, आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी आपले विचार मांडले सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दांडाची रक्कम वाढवण्यात आली. इमारतींचे सांडपाणी सार्वजनिक ठिकाणी सोडल्यास कठोर कारवाई करण्याचा एकमुखी निर्णय गावाने घेतला. कलमठ ग्रामपंचायतने घेतलेल्या अश्या प्रकारच्या बैठकीचे आयोजन केल्यामुळे उपस्थितांनी आभार मानले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरूनाथ वर्देकर, सरपंच संदिप मेस्त्री, उपसरपंच रवींद्र यादव, माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर,दिनेश गोठनकर महेश लाड, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय तळवडेकर, ग्रामपंचायत सदस्य अनुप वारंग, माजी ग्रामविस्तार अधिकारी संजय कवटकर,सचिन खोचरे, नितीन पवार, श्रेयस चिंदरकर, स्वाती नारकर,धीरज मेस्त्री,नजराणा शेख, श्रद्धा कदम,निशा नांदगावकर,विलास गुडेकर, हेलन कांबळे, जयराम चिंदरकर, धनश्री मेस्त्री, विनिता बुचडे,पूजा सावंत, बाळा चिंदरकर,मुख्याध्यापक मधुरा सावंत यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

यावेळी गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा सेविका, सी.आर.पी, सामाजिक मंडळे यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते, सरपंच संदिप मेस्त्री बोलताना म्हणाले कमी वेळेत मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात, गावाबद्दल असणाऱ्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन आज आपल्या आजच्या उपस्थिती मधून झाले असून गावाच्या प्रत्येक कामासाठी आपण असेच सांघिक काम करु असे सांगून सरपंच म्हणून आभार मानले आजच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांना ग्रामपंचायत वतीने जूट पिशवी वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!