देवगड तालुका मराठा समाजाला रुग्णवाहिका प्रदान

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका मराठा समाजाला कै.विजयालक्ष्मी आणि रश्मी राजीव राऊत तसेच कै ललिता आणि कै. यशवंत श्रीपत नलावडे यांच्या स्मरणार्थ समीरा संजीव राऊत यांच्या हस्ते रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला

या सोहळ्याचे प्रास्तविक सूत्रसंचालन स्नेहा सावंत यानी केले.समीरा राऊत व संजीव राऊत या उभयतांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले सदानंद पवार यांनी श्रीफळ फोडून शुभारंभ केला.यावेळी तालुका अध्यक्ष संदीप साटम,संजीव राऊत,निशिकांत साटम यांनी मनोगत व्यक्त केले .सर्व समाजाला ही रुग्णवाहिका माफक दरात उपलब्ध करून देण्यात असल्याचे नमूद करून सामाजिक बांधिलकी जोपासत ही आरोग्य विषयक सेवा निर्माण करण्यात आली असल्याचे मान्यवर समाज बांधवांनी सांगितले.याप्रसंगी संस्था सचिव केदार सावंत,समाज बांधव शामराव पाटील,नगरसेविका प्रणाली माने,नगरसेवक शरद ठुकरूल,रमाकांत जगताप,सदानंद सावंत ,नंदन घोगळे, अनिकेत बांदिवडेकर,मधुकर नलावडे,दयानंद पाटील,शैलेश कदम,डॉ-दत्तप्रसाद सावंत,सूर्यकांत राऊत,सुंदर जगताप,अभय पवार,शंकर धुरी,योगेश राणे,प्रदीप सावंत,प्रवीण सावंत,सौ अनघा राणे,अजित राणे,प्रकाश सावंत,सूर्यकांत पाळेकर व अन्य समाज बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!