भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी केले अभिनंदन
कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा भटक्या विमुक्त जाती सेलच्या कणकवली शहर मंडल अध्यक्षपदी मऱ्याप्पा इंगळे यांची निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी इंगळे यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर , कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,शहराध्यक्ष अण्णा कोदे, आशिये सरपंच महेश गुरव, विजय चिंदरकर, सचिन परधीये, सुभाष मालंडकर, राजू हिर्लेकर, समीर सावंत, प्रशांत राणे, नयन दळवी आदी उपस्थित होते. मऱ्याप्पा इंगळे हे कणकवली तालुका गोंधळी समाज संघटनेचे काककवली तालुकाध्यक्ष असून राणे कुटुंबियांचे कट्टर समर्थक असलेले भाजपा कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत नुकतीच त्यांच्यावर कणकवली शहर मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
