खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण कोष्टीवाडी येथील मूळ रहिवासी असलेली व शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मध्ये इयत्ता ७ वी च्या वर्गात शिकणारी कु.शीतिजा रविंद्र लोकरे वय वर्ष १३ हिचे नुकतेच बुधवार दि. १७/१/२०२४ रोजी कोल्हापूर येथील खाजगी दवाखाण्यात अल्पशा आजाराने निधन झाले.तिच्या निधनाची बातमी समजताच खारेपाटण दशक्रोशित सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक विभागात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले खारेपाटण येथील दिव्यांग शिक्षक रविंद्र जयराम लोकरे यांची मयत कु.शीतीजा लोकरे ही मोठी मुलगी होती.ती गुणी व सोज्वळ अशी मुलगी होती.दोन्ही आई वडील हे पालक दीव्यांग असताना देखील आपल्या अपंगावर मात करीत मयत कु.शितीजा लोकरे यांसह अजून दोन मुली यांचा सांभाळ करीत होते.यातील मोठी मुलगी कु.शितिजा ही अचानक मृत पावल्यामुळे लोकरे कुटुंबियांवर हे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कु.शितिज हीच्या मागे तिच्या दोंन बहिनी,अपंग आई वडील व आजी असा परिवार आहे.













