महायुतीचा 108 चा घोटाळा सुरळीत होण्यासाठी राजन साळवी वर धाड – नाट्य – संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : सगळ्या कोकणाला माहिती आहे. मेडिकल व इंजिनियर कॉलेज सम्राट्ट कोकणातील नेते मंडळी ह्यांचे फोर्ब्स च्या यादीत नावे यावीत एवढी अज्ञात -स्तोत्रा कडून उत्पन्न असणारे आहेत. परंतु ते लोटस कंपनीचे वॉशिंग मशीन मध्ये धुतले गेले आहेत किंवा बाणगंगेत न्हाऊन स्वच्छ झाले आहेत. त्यांचे भक्तीने दिल्ली श्वर प्रसन्न झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना सत्तेचे अभय वरदान आहे . परंतु, आमदार राजन साळवी व वैभव नाईक सारखे नेते शिवसेना पक्षावर निष्ठा ठेवून राहतात आणि भय भित होऊन निसटत नाही , हे सत्ताधीश नेत्याचे खरे दुःख आहे.त्यातून हे बेगडी धाड नाटय चालु आहेत. ही एक प्रकारे आणीबाणी ची नांदी आहे. व त्यातून 108 साठी चे टेंडर आपल्या माणसा साठी पास करून घ्यायचे आहे काय ? हा ही एक प्रश्न उभा राहतो. परंतु , हिटलर सारखे गॅस चेंबर जरी त्यांनी बनविले तरी, बाळासाहेबांचा शिवसैनिक त्याला भिणार नाही आणि असा भयाला भिक घालणार नाही. परंतु , आमचे नेत्याला अस घाबरु पाहणाऱ्या ना सर्व शिव सैनिक ” जेल भरो” आंदोलन घेऊ आणि यांना सर्व जेल कमी पडतील , परंतु, सैनिक मागे हटणार नाही हे दाखवून देवू आता सरकारी यंत्रणा हा भा ज पा चा तुण तुणा वाजवत राहील असेच वाटते आहे . आणि शिव सैनिकांवर “जेलचे “दडपण आणीत राहील . पण , आम्ही त्यालाच सामोरे जाऊ , आणि जनतेच्या न्यायालयात लोकशाही साबूत ठेवू.

error: Content is protected !!