कितीही दबाव आला तरी मी लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही -आ. वैभव नाईक
आ. वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत पळसंब गावाची बैठक संपन्न
मालवण (प्रतिनिधी) : आधी दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता होतो.मात्र गेल्या ९ वर्षांत आमदार वैभव नाईक यांनी पळसंब सह इतर गावात केलेले काम पाहून मी त्यांच्यासोबत आलो आहे. आ. वैभव नाईक यांनी पळसंब गावात अनेक विकास कामे केली. कुणालाही शकय झाले नाही ते साकव, पूल त्यांनी करून दाखवले. त्यांच्या कामामुळे आजूबाजूच्या गावातील जनतेमध्येही त्यांच्याप्रती असलेले प्रेम अनुभवायला मिळते. कोणीही पक्ष सोडून गेले असले तरी पळसंब गाव आमदार वैभव नाईक यांच्याच पाठीशी राहणार आहे अशी ठाम भूमिका पळसंब गावातील जेष्ठ ग्रामस्थ रमेश परब यांनी मांडली.
पळसंब येथे आमदार वैभव नाईक व शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.यावेळी शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या निकालावर ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत शिवसेना उद्धव साहेबांचीच आहे. बाळासाहेबांनी जाताना शेवटी उद्धव आणि आदित्यला सांभाळा असे सांगितले होते याची आठवण करून देत. बाळासाहेबांचे विचार मानणाराच खरा शिवसैनिक असल्याचे ग्रामस्थांनी ठणकावले.
यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, सर्वसामान्य लोकांनी मला निवडून दिले आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हि माझी जबाबदारी आहे. पळसंब गावातील अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली आहेत. कोणतीही आमिषे आली आणि कितीही दबाव आला तरी मी लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही कायम लोकांसोबत राहणार. शिवसेना आणि उद्धवजी ठाकरे यांची साथ सोडणार नाही असे सांगितले.
यावेळी आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, उप विभागप्रमुख अनिल गावकर, विभाग समन्वयक पप्पू परुळेकर, शाखा प्रमुख वैभव सावंत, उपसरपंच अविराज परब,पिंट्या सावंत,रामचंद्र वरक, ग्रा. प. सदस्य ऋतुजा सावंत, मधुकर परब,मनिष पुजारे, लक्ष्मण जुवेकर, सरिता सावंत, बळीराम सावंत, मंगेश सावंत, जयंत पुजारे, शिवराम पुजारे, चंद्रकांत तर्फे, पांडुरंग पुजारे, दिनेश साईल, शेखर पुजारे, अक्षय परब, वैभव परब, प्रसाद पुजारे, रुपेश पुजारे, मंदार सावंत, वासुदेव परब, सीताराम पुजारे, नामदेव पुजारे, मधुकर सावंत, अरुण पुजारे, पल्लवी सावंत, वंदना चिंचवलकर, अनिता सावंत, दक्षता सावंत, स्मिता सावंत, शारदा पुजारे, किशोरी सावंत, शुभांगी सावंत, रतिका गोलतकर, रचना पुजारे, ज्योस्ना पुजारे, मारुती सावंत, अक्षता परब, पूनम गोलतकर, सत्यवान सावंत, अशोक सावंत, अमित पुजारे आदींसह पळसंब येथील ग्रामस्थ उपस्थित होते.