कुडाळ (प्रतिनिधी) : अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम मूर्ती प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त श्री देव रामेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती तेर्सेबांबर्डे व समस्थ रामभक्त यांच्या संयुक्त विद्यमाने रामोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपण सर्व राम भक्तांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित रहावे व सहकार्य करावे.
तेर्सेबांबर्डे येथे श्री रामेश्वर मंदिर मध्ये सोमवारी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता लघु रुद्राभिषेक व प्रभू श्रीराम प्रतिमापूजन होणार आहे.दुपारी 12.30 वाजता महाआरती,1 ते 3 महाप्रसाद, 3.30 ते 5.30 हळदीकुंकू समारंभ, 5.30 ते 6.30 प्रभू श्रीराम नामजप,6.30 वाजता दीपोत्सव व ग्रामस्थांची भजने आहेत,तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव रामेश्वर संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.











