खारेपाटण मध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने संपूर्ण शहर झाले भक्तीमय

प्रभू श्री रामचंद्राच्या पालखी सोहळ्यात सर्व धर्मीय नागरिकांचा सहभाग

जय श्री रामा च्या घोषणेने परिसर गेलं दणाणून

खारेपाटण (प्रतिनिधी) : अयोध्येत साकारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिर उद्घघाटन सोहळा व रामलल्ला मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील खारेपाटण शहरात सर्वत्र विद्युत रोषणाई व ठीकठीकानी उभारण्यात आलेल्या प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिमानी व आकर्षक फुलांच्या सजावटीने व रांगोळ्यांनी संपूर्ण खारेपाटण शहर भगव्या पतकांसह भक्तीमय झाले होते.यावेळी खारेपाटण बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या प्रभू श्रीरामाच्या पालखी सोहळ्यात खारेपाटण मधील सर्व धर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला होता.तर प्रभू जय श्री रामच्या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण शिवाजी पेठे येथील श्री देव विष्णू मंदिरात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तर गावातील सर्वच मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमासह विद्युत रोषणाई तसेच सडा रांगोळी काढण्यात आली होती. सकाळी ९.३० वाजता खारेपाटण केदारेश्वर मंदिर ते गणेश मंदिर बंदरवाडी,खारेपाटण बाजारपेठ मार्गे अशी प्रभू श्री रामाची सुंदर फुलांनी सजविलेले पालखी शेकडो भक्तांच्या उपस्थित काढण्यात आली.बंदर गाव येथे पालखीचे भक्तीभावाने महिलांनी स्वागत केले.व पुन्हा श्रीरामाची पालखी वाजत गाजत शिवाजी पेठ खारेपाटण येथील श्री विष्णू मंदिरात आणून प्रभू श्रीराम मूर्तीचे पूजन डॉ.शंकर राणे व डॉ.सुप्रिया राणे या उभयतांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर या मंदिरात नाधवडे येथील श्री गोखले बुवा यांनी प्रभू राम चरित्र विषयी सुश्राव्य कीर्तन सादर केले.यानंतर सामूहिक आरती करण्यात आली. यामध्ये गावातील सर्व महिला – पुरुष,युवक – युवती, लहान मुले,जेष्ठ नागरिक यांनी सहभाग घेतला होता.तसेच रामरक्षा स्त्रोत पठण देखील घेण्यात आले. उपस्थित सर्वांना गोड प्रसाद वाटण्यात आला.या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर,माजी सरपंच श्री रमाकांत राऊत,जेष्ठ कार्यकर्ते मधुकर गुरव,प्रवीण लोकरे,मंगेश गुरव,संतोष रानडे, डॉ.बलराज येळकोटे,अतुल देवस्थळी,संकेत देवस्थळी,सुभाष देसाई,संजय धाक्रस,राजू ठाकूर देसाई,संकेत शेट्ये, चद्रमोहन शिंदे, प्राजल कुबल,नाना कोळसुलकर, ऋषिकेश जाधव,राजू वरूनकर, अमोल गुरव,तेजस राऊत,किरण कर्ले,किशोर माळवदे,विजय देसाई,नंदकिशोर कोरगावकर,प्रशांत गाठे,उज्ज्वला चिके,श्रद्धा देसाई,दीपा रानडे,यांसह अनेक मान्यवर ग्रामस्थ सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबरोबरच सायंकाळी खारेपाटण येथील श्री देव कालभैरव मंदिर व श्री देव धनी रवळनाथ केदारेश्वर मंदिर येथे असंख्य दिवे लावून फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार असल्याची माहिती भाऊ राणे व सुधीर कुबल यांनी दिली. तर या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शरद देठे खारेपाटण पोलीस दूरशेत्राचे प्रमुख उद्धव साबळे,श्री पराग मोहिते विशेष करून उपस्थित होते.

error: Content is protected !!