नाशिकमध्ये भगवी वस्त्रे आणि रुद्राक्ष घालून चायनीज बहुरूपी कुटुंबासह फिरला
आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
कणकवली (प्रतिनिधी) : आज हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. स्व. बाळासाहेबांसारखा कडवट हिंदुत्ववादी झाला नाही. स्व. बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम पंतप्रधान मोदी करताहेत. बाळासाहेब आज असते तर शाब्बास मोदीजी असा अग्रलेख त्यांनी सामना मध्ये लिहिला असता. दुर्दैवाने हृदयात खान आणि हातात काँग्रेसचा हात असे घोषवाक्य उद्धव ठाकरेंचे आहे. रुद्राक्षाच्या माळा आणि भगवी वस्त्रे घालून बहुरुप्या सारखे नाशिकात उद्धव ठाकरे कुटुंबासह फिरत होते. माझ्या शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही असे म्हणणाऱ्या बाळासाहेबांची शिवसेना आज उद्धव यांनी काँग्रेसच्या पायावर नेऊन ठेवली आहे. बाळासाहेब जे रुद्राक्ष घालायचे ते मातोश्रीवर आहे की कुठे फेकून दिले आहे ? हे जाहीर करण्याची हिंमत उद्धव ठाकरेंत आहे काय ? आज रसातळाला गेल्यावर भगवी वस्त्रे आणि रुद्राक्ष घालून बाळासाहेबांसारखं दिसण्याचा प्रयत्न उद्धव हा चायनीज मॉडेल करत असल्याची प्रखर टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली.











