स्मशानभूमी द्या ; जिल्हाधिकाऱ्यांना सांगवेतील मागासवर्गीयांनी दिले निवेदन

कणकवली (प्रतिनिधी) : सांगवे गावामध्ये आमची ४५० लोक वस्ती आहे. मागासवर्गीय लोकांसाठी, पूर्वीपासुनची सार्वजनिक स्पशान भुमी आहे. परंतु तिथे जाण्यासाठी साधा रस्ता किंवा पायवाट नाही. येथील लोकांना दुस-याच्या कंपाऊंडमधुन झाडी-झुडपातुन, गळाभर उंच रानातुन, वाट काढत, उंच टेकडीवर दोघे-तिघे तिरडीला हाताने धरून प्रेत, रात्री-अपरात्री न्यावे लागते. सदरची स्मशान भूमी ही दोन किलो मीटर जंगलमय भागात असल्यामुळे आणि जाण्यासाठी रस्ता नसल्याने मागासवर्गीय समाजाचे फारच हाल होत आहेत. त्याची प्रत्यक्ष पाहणी करून होणारी ससेहोलपट थांबवुन, आमची रस्त्याची समस्या कायमची सोडवावी किंवा रस्त्यापासून जवळ असलेल्या आमच्या मालकीच्या सार्वजनिक जमिनीमध्ये स्मशान भूमीसाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची अशोक द.कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी सांगवे सोसायटीचे व्हाईस चेअरमन चंद्ररतन कांबळे, ग्रामपंचायत सांगवेचे माजी सदस्य,सिध्दार्थ कांबळे, प्रदिप कांबळे आणि कार्यकर्ते विजय य.कांबळे,पुतळाजी कांबळे,राजाराम भ.कांबळे हे उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी स्मशानभुमीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वाशन दिले.

error: Content is protected !!