कणकवली पोलीस निरीक्षकपदी मारुती जगताप यांची नियुक्ती

26 जानेवारी रोजी रात्री स्वीकारला कार्यभार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाण्याच्या रिक्त असलेल्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी काढले असून नूतन पोलीस निरीक्षक जगताप यानी 26 जानेवारी रोजी रात्री कणकवली पोलीस निरीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या होत्या. पीआय अमित यादव यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली झाल्यापासून कणकवली पोलीस निरीक्षकपद रिक्त होते. रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षकपदी यशस्वी कार्यभार सांभाळलेल्या पीआय मारुती जगताप यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली झाल्यानंतर त्यांच्याकडे कणकवली पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था राखतानाच राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कणकवली पोलीस ठाण्याची महत्वपूर्ण जबाबदारी नूतन पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांना पार पाडावी लागणार आहे.

error: Content is protected !!