उपतालुकाप्रमुख दामू सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी केली कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : पक्षविरोधी वर्तन केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेचे कणकवली उपतालुकाप्रमुख दामू सावंत यांची उपतालुकाप्रमुख पदावरून उचलबांगडी करतानाच 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केल्याची घोषणा जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दामू सावंत यांनी वेळोवेळी पक्षविरोधी कृती केली.पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्वास बाधा येईल असे सार्वजनिक ठिकाणी वर्तन केले. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडे या बाबत खात्री केल्यानंतर उपतालुकाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार 6 वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.

error: Content is protected !!