आचरा पोलिस निरीक्षक सुरेश गावित यांचे मालवण शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे यांनी केले स्वागत

आचरा (प्रतिनिधी) : आचरा पोलिस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक सुरेश ठाकूर गावित यांचे आचरा पोलीस स्टेशन येथे मालवण शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसह भेट घेऊन स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. शनिवारीच 27 जानेवारीला गावित यांनी आचरा पोलीस स्टेशनचा कारभार स्वीकारला आहे.

यावेळी अवधूत हळदणकर, महेंद्र घाडी, अभिजित सावंत, चंदू गोलतकर, चंद्रकांत कदम, अमर पळसंबकर, प्रफुल्ल घाडी, श्रीपाद सावंत, अश्विन हळदणकर, प्रमोद देसाई आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!