मालवण (प्रतिनिधी) : हडी गावात दोन महिने तलाठी कार्यालयात तलाठी नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या बाबत निवेदने तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन सुद्धा जाणीव पूर्वक प्रशासन दर्लक्ष करीत असल्याने ग्रमस्थ त्रस्त झाले आहेत. गावासाठी तलाठी न मिळाल्यास १० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी दिली आहे. तहसीलदार यांना सात वेळा भेटून तलाठी देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हडी ग्रामस्थांची तलाठी नसल्याने गैरसोय












