एन एम एम एस परीक्षेत आर ए यादव हायस्कूल आडवलीचे उज्ज्वल यश….!

आचरा (प्रतिनिधी) : 14 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत मालवण तालुक्यातील आर. ए. यादव हायस्कूल आडवलीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. हा निकाल गुणवत्ता यादी परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर यथा अवकाश घोषित करण्यात येणार आहे.

या परीक्षेत प्रथम क्रमांक कु. मैथिली कुसाजी राऊळ (खुला गट ), द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी हेमंत घाडीगांवकर ( खुला गट ), तृतीय क्रमांक- कु. रेवती सुनिल लाड ( NT B गट ), तृतीय क्रमांक- कु. संपदा गोपाळ मेस्त्री (ओ बी सी गट ), चतुर्थ क्रमांक- कु. जागृती अनिल तांडेल ( ओ बी सी गट ) यांनी प्राप्त केला आहे.

सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे मुख्याध्यापक – तुषार सकपाळ, सहाय्यक शिक्षक-संदीप कोळापटे, साईनाथ झाडे, सौ. तृप्ती वारंग यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळा समिती अध्यक्ष – कमलाकांत कुबल, सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई सदस्य अरुण लाड सर्व मुंबई पदाधिकारी व सदस्य, पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!