खारेपाटण काजिर्डे येथे भाजप च्या वतीने घर चलो अभियानास प्रारंभ

माजी जि.प.सदस्य व बांधकाम वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांची विशेष उपस्थिती

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी महाविजय २०२४ बूथ स्तरीय घर चलो अभियान अंतर्गत २६८ – कणकवली विधानसभा मतदार संघातील बूथ क्रमांक – १९५ अर्थात खारेपाटण काजिर्डे येथे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम समिती सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांच्या घरी गृहभेटी देण्यात आल्या.

याप्रसंगी भाजप कार्यकर्ते श्रीधर गुरव, भाऊ राणे, शमशूद्दीन काझी,खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव, माजी उपसरपंच इस्माईल मुकादम, ग्रा.पं.सदस्या दक्षता सुतार,गफार काझी, शरीफ काझी, हसन काझी, गणी काझी, शाहरुख काझी, रेहाना काझी, सुरय्या काझी, मुन्ना काजी, हसीना मुकरी,परविन काझी, तुबा काझी, झुलपा काझी, उखबा काझी, बसरा काझी, झुबेदा काझी, चांदबी मुकादम, हापीजी काझी,नुरजान काझी, खैरून काझी, शमा काझी,कौसर काझी, आफरिन काझी,सुलताना सय्यद, नजमा काझी, खतिजा काझी, रजिया काझी, झुबेदा काझी, रुकसाना काझी, सईका काझी, आलिया काजी या मान्यवरांसह खारेपाटण काजिर्डे गावातील सर्व भाजपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजप पदाधिकारी रवींद्र जठार यांनी काजीर्डे येथील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या घरी जाऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या घर चलो अभियानाची सविस्तर माहिती दिली.व देशात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करूया असे आवाहन केले.

error: Content is protected !!