अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात गणेश जयंती भक्तीभावात साजरी!

मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने मंदिरातील पुरातन गणेश मंदिरात श्री गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी श्री गणेशास पंचामृत अभिषेक करण्यात आले. तदनंतर दुपारी १२: ०५ वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते
सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत व पुजारी मंदार महाराज यांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजा व आरती करून गणेश जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी अनेक भाविक उपस्थित होते. गणेश जयंतीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने उपस्थित हजारो भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. गणेश जयंतीचे औचित्य साधून दिवसभर हजारो भाविकांनी श्री गणेशाचे व स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. याप्रसंगी उज्वलाताई सरदेशमुख, शिवशरण अचलेर, विपुल जाधव, श्रीपाद सरदेशमुख, सागर गोंडाळ, महेश मस्कले, संजय पवार, गिरीश पवार, महादेव तेली, संजय पवार, संतोष पराणे आदिसह मंदिर समितीचे कर्मचारी व गणेशभक्त, स्वामीभक्त उपस्थित होते.

error: Content is protected !!