लोरे नं 2 गावात अग्नितांडव; अशोक चव्हाण यांचे राहते घर जळून खाक

फोंडाघाट (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील लोरे नं 2 गावातील सुतारवाडीत आज दुपारी अग्निप्रकोप झाला.सुतारवाडी मधील रहिवासी अशोक चव्हाण यांच्या राहत्या घराला आग लागली.या आगीत अशोक चव्हाण यांचे घर जळून खाक झाले.घरातील सर्व संसारोपयोगी आणि वापरातील सर्व साहित्य जळून गेले. या दुर्घटनेत अशोक चव्हाण यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सुतारवाडीतील ग्रामस्थांनी मोठ्या धीराने आग विझवली.मात्र तोवर अशोक चव्हाण यांचे घर पूर्ण जळून गेले होते.

error: Content is protected !!