खारेपाटण येथे राष्ट्रीय महामार्ग सुरक्षिता रस्ता प्रवास जनजागरण अभियानास प्रारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सुरक्षित रस्ता प्रवास जनजागरण अभियानास आज मुंबई. – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण चेक पोस्ट येथे सहायक कार्यकारी अभियंता अतुल शिवणीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

यावेळी खारेपाटण पोलीस आऊट पोस्ट स्टेशन चे पोलीस अधिकारी उद्धव साबळे, होमगार्ड – चेतन राणे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय खारेपाटण चे कनिष्ठ अभियंता डी जी कुमावत, कर्मचारी जी एल हरयान, एस व्ही दळवी, मेघना गुरव यांसह के सी सी बिल्डकाँन कंपणीचे रनविजय सिंह, रामप्रवेश दिवणा, सत्यम पांडे, प्रेम शर्मा आदी मान्यवर कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात दरवर्षी रस्ते अपघातात अनेक नागरिकांचे बळी जात असतात. या अनुषंगाने दरवर्षी शासनाच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात येते. मात्र २०२४ च्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने सुरक्षित रस्ता प्रवासासाठी उपयुक्त माहितीने परिपूर्ण असलेली पुस्तिका महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायाने प्रसिद्ध केली असून आज खारेपाटण महामार्ग येथे सर्व वाहन चालकांना थांबवून या पुस्तिकेचे वाटप खारेपाटण अभियंता कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.

या बरोबरच सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन वजा सूचना वाहनचालकांना या जनजागरण अभियानाच्या माध्यमातून देण्यात आल्या. या अभियानास खारेपाटण पोलीस तसेच के सी सी बिल्डनकाँन यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!