खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील श्री देव नृसिंह मंदिर मंदिर खारेपाटण येथे प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी दी.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री नृसिंह देवाची वार्षिक पूजा यांसह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री देव नृसिंह प्रतिष्ठान खारेपाटण पदाधिकारी रमाकांत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण वरचे स्टँड येथे असलेल्या श्री देव नृसिंह देवाचे नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिराचे गेल्या वार्षिच उद्घाघाटन करून मुर्तीप्रतिष्ठापणा करण्यात आली होती.खारेपाटण हसोळ टेंब – कोंडवाडी येथील बांधव एकत्र येऊन दरवर्षी श्री नृसिंह देवाची पूजा भक्तीभावाने करत असतात.यावर्षी दी.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी पुजे निमीत्त नागरिकासाठी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री देव नृसिंह पूजे निमित्त आयोजित केलेले कार्यक्रम पुढील प्रमाणे – सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत अभिषेक,पूजा व आरती,दुपारी १.०० ते ३.०० महाप्रसाद,सायंकाळी ३.०० ते ५.०० महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ,सायं.७.०० ते ९.०० वारकरी हरीपाठ व रात्री ठीक ९.३० वाजता बुवा – प्रथमेश चव्हाण – फोंडाघाट, ता.कणकवली व बुवा – प्रथमेश जनक – कुणकवण, ता. देवगड जि.सिंधुदुर्ग यांचा डबलबरी भजनांचा जंगी सामना होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव नृसिंह प्रतिष्ठान खारेपाटणच्या वतीने करण्यात आले आहे.











