कणकवली (प्रतिनिधी) : सकल मराठा समाज, कणकवलीच्यावतीने शिवजयंती उत्सव १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. रविवार १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता आमने सामने डबलबारी भजनाचा सामना देवगड,खुडी येथील बुवा संतोष जोईल(गुरुवर्य श्रीधर मुणगेकर) व कुडाळ,भरणी येथील बुवा विनोद चव्हाण(गुरुवर्य चिंतामणी पांचाळ)यांच्यामध्ये होईल.
तर दुसऱ्या दिवशी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, सकाळी ११ वाजता कणकवली मराठा समाज प्राथमिक शिक्षक आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा होईल. या स्पर्धेतील गट क्र.१ (इ.५ वी)साठी विषय’शिवरायांच्या स्वराज्य जडणघडणीतील एक प्रसंग’. गट क्र. २ (इ. ६ वी ते ८ वी) साठी विषय ‘राजमाता जिजाबाईचे स्वराज्यासाठीचे योगदान’ किंवा ‘छत्रपती शंभूराजे’. गट क्र. ३ (९ वी ते १२ वी)साठी विषय ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यापारी आणि शेतीविषयक धोरण’ किंवा’ शिवराज्याभिषेक’ असेल.
सकाळी ११.३० ते १ कणकवली मराठा समाज प्राथमिक शिक्षक आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेतील गट-अ (इयत्ता ५ वी)साठी विषय ‘सिंधुदुर्ग किल्ला’ किंवा ‘शिवाजी महाराज’.गट-ब (इयत्ता ६ वी ते ८ वी) साठी विषय’शिवाजी महाराजांचे सिंहासन आरूढ व्यक्तिचित्र’ किंवा ‘माझा आवडता किल्ला’.असे विषय आहेत. रात्री ९ वाजता राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा होईल.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा,असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.