शिवराज्यभिषेक सोहळा व पालखी मिरवणूक यांसह शिवव्याख्याते युयुस्तु आर्ते यांची उपस्थिती
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी येणाऱ्या जयंती निमित्त शिवजयंती उत्सव समिती खारेपाटण च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिवजन्मोस्त्व सोहळ्याचे देखील आयोजन किल्ले खारेपाटण येथे करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख व खारेपाटण शिवजयंती उत्सव समितीचे कार्यवाह मंगेश गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
सकाळी ९.०० वाजता केदारेश्वर मंदिर खारेपाटण ते किल्ले खारेपाटण पर्यंत शीवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून लाठी काठी मर्दानी व साहसी खेळांचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११.०० वाजता खारेपाटण किल्ल्यावरील श्री माता दुर्गादेवी हिला श्रीफळ अर्पण करून शिवकण्यांच्या शुभहस्ते शिवछत्रपतींच्या प्रतीमेचे पूजन करण्यात येणार आहे.यावेळी ध्वजारोहण,महाराष्ट्रागीत,शिवप्रेरणा व ध्येय मंत्र,मान्यवर मनोगत, अल्पोहर, शिवगिते पोवाडे,समूहगीते, कराओके – मराठी भावगीते,तर सायं.६.३० वाजता देवरूख येथील शिवविख्याते युयुस्तु आर्ते सर यांचे शिवव्याख्यान ठेवण्यात आले आहे. सायंकाळी ७.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव राज्यभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्थानिक कलाकारांच्या सहायाने जिवंत शिवराज्यभिषेक सोहळा कार्यक्रमाचे आयोजन खारेपाटण किल्ल्यावर सादर करण्यात येणार आहे.
तसेच या शिवजयंती उस्तव करिता ग्रामपंचायत खारेपाटण, श्री कालभैरव – दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपाटण,राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, खारेपाटण महविद्यालय व सकल मराठा समाज खारेपाटण या संस्थांनी सहभाग दर्शविला आहे. तरी या उस्त्वला खारेपाटण मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घ्यावा.असे आवाहन आयोजक ऋषिकेश जाधव यांनी केले आहे.