बत्तीच्या प्रकाशात सादर झाले जत्रोत्सवातील दशावतारी नाटक

वेंगुर्ले येथे आजही जपली जाते आगळीवेगळी परंपरा

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : श्रीदेव मानसीश्वराचे देवस्थान हे सिंधुदुर्गातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध धार्मिक पर्यटनस्थळ व जागृत देवस्थान आहे. या देवस्थानचा जत्रोत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. काल १७ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या अलोट गर्दीत हा जत्रोत्सव संपन्न झाला. या जत्रोत्सवादिवशी रात्री १ वाजता दशावतारी नाटक सादर होते. हे दशावतारी नाटक आजही पारंपरिक पद्धतीने आणि प्रथेप्रमाणे गॅस बत्तीच्या प्रकाशात शेकडो भक्तांच्या आणि नाट्य रसिकांच्या समोर सादर झाले. मुख्य देवस्थानपासून काही अंतरावर हा नाटकाचा मंडप उभारलेला होता. त्या मंडपात नवस म्हणून आलेल्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्या सायंकाळ पासून लावल्या जात होत्या. या लावण्यात आलेल्या बत्तीच्या प्रकशातच हे दशावतारी नाटक सादर झाले. त्याचा सर्वांनी लाभ घेतला.

error: Content is protected !!